वैद्यकीय अधिकारी संपावर; रुग्ण वार्‍यावर

By Admin | Updated: July 3, 2014 20:27 IST2014-07-03T20:25:33+5:302014-07-03T20:27:29+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी दोन दिवसांपासून संपावर आहेत.

Medical officer strike; The patient wounds | वैद्यकीय अधिकारी संपावर; रुग्ण वार्‍यावर

वैद्यकीय अधिकारी संपावर; रुग्ण वार्‍यावर

जामठी बु. : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रस्तुत प्रतिनिधीने ३ जुलै रोजी फेरफटका मारला असता केवळ दोन परिचारिका व एक कर्मचारी कर्तव्यावर असल्याचे दिसून आले. परिचारिका रुग्ण तपासणीचे काम करीत होत्या. तर एक कर्मचारी रुग्ण नोंदणीचे काम करीत होता. परिसरातील गावांमधील रुग्णांसाठी या आरोग्य केंद्राचा मोठा आधार आहे; परंतु गत दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी संपावर असल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. माना येथील डॉ. काळे हे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रभार सांभाळत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी संपकाळात पर्यायी व्यवस्था करतील, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Medical officer strike; The patient wounds