तेल्हार्यातील माधव नगरात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:36 IST2017-11-23T20:34:05+5:302017-11-23T20:36:18+5:30
तेल्हारा : स्थानिक माधव नगरातील २0 वर्षीय विवाहितेचा पतीसह इतरांनी पैशांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तेल्हार्यातील माधव नगरात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : स्थानिक माधव नगरातील २0 वर्षीय विवाहितेचा पतीसह इतरांनी पैशांच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तेल्हारा शहरातील माधव नगरस्थित रहिवासी फिर्यादी दुर्गा पवार हिला तिचा प ती अरुण नागोराव पवार, सासरा नागोराव नामदेव पवार, दीर गजानन नागोराव पवार, सासू सुमन नागोराव पवार व वच्छला नामक महिला सर्व रा. टाकळी यांनी संगनमत करून माहेरहून पैसे आणायला सांगितले. विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिल्याने हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविण्यात आले हो ते; परंतु त्यावर कोणत्याच प्रकारचा समेट व तोडगा न निघाल्यामुळे प्रकरण तेल्हारा पोलिसांकडे परत आले. २२ नोव्हेंबर २0१७ रोजी २0 वर्षीय विवाहि तेच्या लेखी तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध भादंविच्या ४९८ अ, ३२९, ५0४, ५0६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी तेल्हारा पोलीस निरीक्षक सचिंद्र शिंदे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागोराव भांगे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.