विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह मुलांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: November 17, 2014 01:37 IST2014-11-17T01:37:32+5:302014-11-17T01:37:32+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल.

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह मुलांविरुद्ध गुन्हा
अकोला: माहेरावरून हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्या पती व मुलांविरुद्ध खदान पोलिसांनी रविवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला.
जीएमसी क्वॉर्टर गोरक्षण रोड येथे राहणार्या रेखा रामलाल वानखडे (४१) यांच्या तक्रारीनुसार, बेलखेड येथे राहणारा पती रामलाल किसन वानखडे (४८), मुले सागर रामलाल वानखडे (२३) व प्रीतम वानखडे (२६) हे गत काही महिन्यांपासून माहेरावरून २ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत आहेत. माहेरावरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिला उपाशी ठेवतात आणि शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देऊन शारीरिक व मानसिक छळ केला आणि रेखा वानखडे हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत, तिला घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती; परंतू तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने रेखाबाईने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून खदान पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ४0६, ५0६ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.