विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST2021-08-14T04:23:54+5:302021-08-14T04:23:54+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील हिंगणे गव्हाळ येथील मृत विवाहितेचे वडील सुनील काशीराम इंदोरे (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी शारदा हिचा ...

Marital suicide; Three arrested | विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

बुलडाणा जिल्ह्यातील हिंगणे गव्हाळ येथील मृत विवाहितेचे वडील सुनील काशीराम इंदोरे (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी शारदा हिचा विवाह चार महिन्यापूर्वी बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील महादेव गजानन मुंढे (२५) यांच्यासोबत झाला होता. शारदा हिला आरोपी पती महादेव गजानन मुंढे, गजानन राजाराम मुंढे (५५), लीलाबाई गजानन मुंढे (५०) सर्व (रा. मांजरी) यांनी वडिलांकडून हुंड्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून शारदाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. फिर्यादी सुनील इंदोरे यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी उरळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ठाणेदार अनंत वडतकर, उपनिरीक्षक जाधव, जमादार झाकर्डे, नेरकर, पो.कॉ. नेमाडे, ठोंबरे, व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन आरोपींना तात्काळ अटक केली. आरोपींविरुद्ध उरळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marital suicide; Three arrested