शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अकोल्यात फुलपाखरांचे मराठी बारसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 10:55 IST

अकोल्याच्या परिसरात तब्बल ९१ पेक्षा अधिक प्रजातीची फुलपाखरे बागडत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राणी विश्वातील फुलपाखरे हा असा एकमेव जीव आहे जो मानवी मनाला विस्मयचकीत करीत असतो. त्यांच्या आकारातील विविधता, चमकदार रंगसंगती, पंखांच्या रोमांचकारी हालचाली आपल्याला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देत असतात. अकोल्याच्या परिसरात तब्बल ९१ पेक्षा अधिक प्रजातीची फुलपाखरे बागडत असतात. वाढत्या प्रदूषण व पर्यावरणाच्या ºहासामुळे फुलपाखरांचा वावर काही थांबला आहे. तो पूर्णत: थांबला तर जैवविविधता धोक्यात येऊ शकते.निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला परिसर अकोल्याला लाभला आहे. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये चांगल्या संख्येमध्ये जैवविविधता आहे. उत्तरेकडे मेळघाटचे छत्र, पूर्वेकडे गवताळ माळरानांचा प्रदेश तर पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये जैवविविधता संपन्न वनांचा समावेश आहे. त्यामुळेच अनेक प्रकारची फुलपाखरे अकोला जिल्ह्यामध्ये आढळतात. फुलपाखरांचं अस्तित्व असते ते वनस्पतींतील विविधतेमुळे. फुलपाखरांना आपल्या जीवनक्रमामध्ये अन्न वनस्पती व आधार वनस्पती या दोन्हीची गरज असते. फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवळ पसरली असून, अनेक रानफुले निसर्गाचे सौंदर्य वाढवित आहे. या फुलांवर सध्या फुलपाखरांचे बागडणे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. फुलपाखराचं हे बागडणं शहरातही होते; मात्र कॉंक्रीटचे जंगल वाढत गेले अन् फुलपाखरांनी शहरातून काढता पाय घेतला. आता ज्यांच्या घरी बाग आहे, फुलझाडे आहेत येथे फुलपाखरे दिसतात. त्यामुळे फुलपाखरांना बागडण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.फुले तोडू नका, फवारणीचाही धोकाशहरातील फुलपाखरांची संख्या कमी होण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील झाडांवरची फुले अनेक कारणांमुळे का हाईना तोडली जाणे, फुलांची संख्या कमी होणे, शेती प्रदेशातील कीटनाशकांच्या फवारणीमुळे, शहरातील प्रदूषणामुळे आणि शिकारी पक्ष्यांमुळे फुलपाखरांवर संकट उभे ठाकले आहे. २२ वर्षापासून सुरू आहे उपक्रम अकोल्यातील पर्यावरण अभ्यासक उदय वझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांना मराठी नावे देण्याचा उपक्रम गेल्या २२ वर्षापासून सुरू केला आहे. फुलपाखरांच्या अस्तित्वासाठी फुले तोडू नका, हा उपक्रमही राबविला आहे. यावर्षी कोरोनासंकटात कुठलाही कार्यक्रम नसला तरी जनजागृती सुरूच आहे.

फुलपाखरांसाठी एवढेच कराअनेक उद्यानांमधून वृक्ष, लता, वेली याचे रोपण अशाच वनस्पतींची निवड करा ज्यामुळे फुलपाखरे, पतंग, मधमाशा आणि अनेक कीटकांना अन्न व आश्रय मिळेल. स्थानिक किंवा संपूर्ण भारतीय / देशी झाडे लावणे, फुलपाखरांना मकरंद (नेक्टर) मिळेल अशा वनस्पतींची लागवड करणे, झाडावरील फुले फुलपाखरे व इतर कीटकांसाठी अबाधित ठेवणे, त्रास देणाºया किडींपासून सुटका करून घेण्यासाठी फुलपाखरासारख्या कीटकांचा संहार होणार नाही, अशी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

या फुलपाखरांचा अकोल्यात वावरकॉमन जेझेबल, कॉमन टायगर, स्ट्राइपड् टायगर, कॉमन मोरमोन, लाइन बटरफ्लाय, कॉमन लेपर्ड, येलो पॅन्सी, ब्राऊन पॅन्सी, ब्लू पॅन्सी, कॉमन रोझ, कॉमन ग्रास येलो, एमीग्रांट, कॉमन सेलर, आॅरेंज टीप, ब्लू टायगर, ग्लासी टायगर, कॉमन क्रो, जोकर, एम प्लाय, ग्राम ब्लू, स्वॉर्ड टेल, क्रीमझन टीप, कॉमन इव्हनिंग ब्राऊन, पिकॉक पॅन्सी या सर्व फुलपाखरांची मराठी नावेसुद्धा खूप सुरेख आहेत. जसे आॅरेंज टीप बटरफ्लाय म्हणजे शेंदूर टोक्या फुलपाखरू. ही फुलपाखरे प्रामुख्याने आढळतात. पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने फुलपाखरांची जुजबी ओळख करून घेता येते, त्यामुळे फुलपाखरांचे निरीक्षण करून त्याची ओळखीचा शोध घेण्याची गरज आहे. फुलपाखरे ही अनेकदृष्ट्या जैवविविध कशी आहेत, ही गोष्ट दर्शवते. पर्यावरणामध्ये सशक्त जैवविविधता असेल तरच सर्व मानवजातीचे हित आहे. फुलपाखरांचे जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते घराघरातून पटवून देण्यासाठी मनोरंजनातून ज्ञानार्जन कार्यक्रम करणे आवश्यक आहे.- उदय वझे,पक्षी, पर्यावरण अभ्यासक 

प्राणी विश्वातील फुलपाखरे हा असा एकमेव जीव आहे जो मानवी मनाला विस्मयचकित करीत असतो. निसर्ग संपदेतील ही वैविधता खरे तर शालेय शिक्षणापासूनच न्याहाळल्या गेली तर त्यामध्ये खूप काही हाती गवसेल, हे निश्चित. त्या अनुषंगाने शासनाने विचार करायला हवा.-दीपक जोशीपक्षी मित्र  

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण