शेतीवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T19:51:13+5:302014-05-31T21:55:43+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील शेताच्या वादासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

शेतीवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित
सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकर्यांची शेताच्या वादासंदर्भातील अनेक प्रकरणी तहसिल कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच दिवानी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहेत. काही शेतकर्यांना तर ही प्रकरणे निकाली निघण्यासाठी वर्षानूवर्षे प्रतिक्षा करावी लागते. शेत रस्त्यांचा वाद, शेती हडपणे, बनावट दस्तावेजांच्या आधारे शेतीवर ताबा मिळविणे, सावकारी व्यवहारात अडकलेली शेती, शेतीची मोजणी अशी अनेक महसुली प्रकरणे संबंधित विभागा प्रलंबित आहेत. न्याय मिळविण्यासाठी शेतकर्यांना वारंवार या कार्यालयांची उंबरठे झिजवावी लागतात. त्यामुळे या शेतकर्यांना आर्थीक झिजही सहन करावी लागते. आजपर्यंत शेतीच्या वादातून घराघरात वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या वादांचा उद्रेक होऊन त्याचे पर्यवसण हाणामारीत होते. या वादातून हत्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. या शेती संबंधीत वादांची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागते. यात वेळ व पैसा दोन्हीचे नुकसान होते. ऐन पेरणीच्या हंगामात ही प्रकरणे निकाली निघण्याची आशा शेतकर्यांना असते परंतु त्यांचा पदरी निराशाच पडते. अशी प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यासाठी शासनाने महसुल विभागास आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.