मनवानी हत्याकांडातील आरोपीस जामीन
By Admin | Updated: April 26, 2017 01:50 IST2017-04-26T01:50:54+5:302017-04-26T01:50:54+5:30
अकोला : दक्षता नगर संकुलाच्या पाठीमागील मैदानात झालेल्या महेश मनवानी हत्याकांड प्रकरणातील चारपैकी एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला.

मनवानी हत्याकांडातील आरोपीस जामीन
अकोला : सिंधी कॅम्पमध्ये असलेल्या दक्षता नगर संकुलाच्या पाठीमागील मैदानात झालेल्या महेश मनवानी हत्याकांड प्रकरणातील चारपैकी एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला.
दक्षता नगर व्यापारी संकुलाच्या पाठीमागे पैसे देवाण-घेवाणच्या कारणावरून महेश मनवानी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली; मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींचे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने महेश मनवानी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अंकुश पाटील यांना जामिनावर सोडले