शौर्य दिनानिमित्त मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST2021-01-04T04:16:28+5:302021-01-04T04:16:28+5:30

देवळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती फाेटाे अकोला : ग्रामपंचायत देवळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ...

Manavandana on the occasion of Shaurya Dina | शौर्य दिनानिमित्त मानवंदना

शौर्य दिनानिमित्त मानवंदना

देवळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती फाेटाे

अकोला : ग्रामपंचायत देवळी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच वैशाली विकास सदाशिव ग्रामपंचायत सदस्य रूपाली दिनेश नवलकार, देवानंद सदाशिव, तंटामुक्ती अध्यक्ष संजयजी बोबडे, ग्रामपंचायत कर्मचारी मनीष म्हस्के, गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष बोबडे, विलास सदांशिव, गंगाधर सदाशिव, आदी उपस्थित हाेते. यावेळी देवळी गावातील शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या मुलींना वही, रजिस्टर व पेन वाटप करून अभिनव जयंती साजरी केली.

किसान सभा-भाकपचे कार्यकर्ते रवाना

अकोला : स्थानिक शिवर अकोला येथून रविवारी किसान सभा भाकपचे आयटकचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील आंदाेलनात सहभागी हाेण्यासाठी वाहन जथा नागपूरकडे रवाना झाला. या प्रसंगी प्रकाश रेड्डी भाकप नेते, कॉ. राजू देसले, किसान सभा राज्य सचिव, नेतृत्वात निघालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. रमेश गायकवाड यांनी झेंडा दाखवून वाहन जथा रवाना केला.

Web Title: Manavandana on the occasion of Shaurya Dina