जिवंत माणसाचा काढला ‘मयत जाहीरनामा’!

By Admin | Updated: August 23, 2014 02:17 IST2014-08-23T01:34:58+5:302014-08-23T02:17:57+5:30

अकोला पोलिस आणि महसूल प्रशासनाचा गलथानपणामुळे जिवंत माणसाचा ‘मयत जाहीरनामा’ प्रकाशित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

'Manat Manifesto' removed alive man! | जिवंत माणसाचा काढला ‘मयत जाहीरनामा’!

जिवंत माणसाचा काढला ‘मयत जाहीरनामा’!

बोरगाव वैराळे - पोलिस आणि महसूल अधिकार्‍यांच्या गलथानपणामुळे जिवंत माणसाचा ह्यमयत जाहीरनामाह्ण प्रकाशित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. धामणा येथील सिद्धार्थ यशवंत सावंग यांच्यासोबत हा प्रकार घडला असून, याला उरळ पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. धामणा येथील अंबादास सावंग यांनी दोन महिन्याआधी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती सिद्धार्थ यशवंत सावंग यांनी उरळ पोलिसांना दिली होती. उरळ पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर र्मग खबरी मंजुरीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामार्फत बाळापूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांना प्राप्त झाली. शासन नियमाप्रमाणे बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ७ ऑगस्ट २0१४ रोजी पत्र क्र.अविद/प्र२/कावि/८00७/१४ नुसार मयत जाहीरनामा प्रकाशित केला. यामध्ये मयत व्यक्तीचे नाव सिद्धार्थ यशवंत सावंग दाखविण्यात आले. या जाहीरनाम्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले की, सिद्धार्थ सावंग यांच्या मृत्यूबाबत काही संशय व आक्षेप असल्यास १५ दिवसांच्या आत सबळ पुराव्यासह संबंधितांनी न्यायालयात उपस्थित रहावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही. तसेच या मृत्यूला अंतिम मंजुरी प्रदान करण्यात येईल, असे जाहीरनाम्यात म्हटले होते. आक्षेप दाखल करण्याची २१ ऑगस्ट २0१४ ही शेवटची तारीख होती. गावच्या तलाठय़ाने शुक्रवारी ही नोटीस सिद्धार्थ सावंग यांच्याच हातात दिली आणि स्वत:चाच मयत जाहीरनामा वाचून सिद्धार्थची बोलती बंद झाली. कुणीही आक्षेप न नोंदविल्यामुळे सिद्धार्थ सावंग शासनाच्या लेखी मयत झालेले आहे. या गंभीर प्रकाराबाबत सिद्धार्थ सावंग यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 'Manat Manifesto' removed alive man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.