ऑटोला अपघातात आईच्या तेरवीचे सामान नेणारा युवक ठार

By Admin | Updated: July 1, 2016 02:13 IST2016-07-01T02:13:03+5:302016-07-01T02:13:03+5:30

आकोट तालुक्यातील वाई येथील घटनेत ऑटोचालक किरकोळ जखमी.

The man killed mother's thirteenth person in a car crash | ऑटोला अपघातात आईच्या तेरवीचे सामान नेणारा युवक ठार

ऑटोला अपघातात आईच्या तेरवीचे सामान नेणारा युवक ठार

आकोट (जि. अकोला): आईच्या तेरवीचे सामान ऑटोरिक्षामध्ये घेऊन जात असताना वाई फाट्याजवळ ऑटोला अपघात होऊन मुलगा अपघातात ठार झाल्याची घटना ३0 जूनच्या रात्री घडली. आकोट तालुक्यातील धामणगाव येथील प्रशांत लासूरकर (२२) हा गुरूवारी रात्री त्याच्या आईच्या तेरवीचे सामान आकोट येथून घेऊन ऑटोरीक्षाने गावाकडे जात होता.सदर ऑटोला वाई फाट्याजवळ अपघात घडला असल्याची माहिती कारला येथील ऑटोचालक दीपक चिंचोळकर यांनी सांगितले.सदर अपघात कसा घडला याबाबत कसलीही माहिती मिळू शकली नाही.प्रशांतचा मृतदेह आकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.पोलीससुद्धा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आहेत.ऑटोचालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला असून, अ्रॉटोचा काच फुटला आहे. आकोट ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The man killed mother's thirteenth person in a car crash