ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:28 IST2020-05-18T16:28:07+5:302020-05-18T16:28:16+5:30
ट्रकने जबर धडक दिल्याने वृद्ध ठार झाल्याची घटना कुरुम बस स्थानकावर १८ मे रोजी घडली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुम : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिल्याने वृद्ध ठार झाल्याची घटना कुरुम बस स्थानकावर १८ मे रोजी घडली. बिहारीलाल दशरथ गुजर (६२)रा.कुरुम असे मृताचे नाव आहे.
कुरुम रेल्वे स्टेशन येथील रहिवासी बिहारीलाल दशरथ गुजर बँकेचे काम आटोपून दुचाकी क्र.एमएच २७ एस २२४४ या वाहनाने महामार्ग ओलांडून घरी परत जात होते. यावेळी अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक क्र.सीजी ०४ जेसी ४५५९ या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात वृद्ध दुचाकीस्वार दुचाकीसह खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. यावेळी चालक ट्रक कुरुम बस थांब्यावर सोडून घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बिहारीलाल गुजर यांना येथील सामाजिक कार्यकर्ते मनीष महाजन यांच्या खासगी वाहनाने नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचाराकरिता अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पो.स्टे.माना येथे गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)