अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 11:28 AM2022-06-12T11:28:49+5:302022-06-12T11:28:54+5:30

Accident News : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली.

Man dies in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

googlenewsNext

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लाखपूरी फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली.
             विलास भिकाजी गवई (५०, राहणार ब्राम्हणवडा थडी ता. चांदुर बाजार) हा गेली २० वर्षापासून लाखपूरी परीसरात भिग मागून आपली उपजीविका भागवत असे.  लाखपूरी फाट्यावर असलेल्या पंचर दुकानाजवळ रोज रात्री विसावा घेत होता, नेहमी प्रमाणे तो १२ जून च्या रात्री विसाव्यासाठी गेला असता रस्त्याने येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तो जागीच गतप्राण झाला. रात्री गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला पोलिसांनी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या संदर्भात पोलीसांनी ब्राम्हणवडा थडी माहीती पोहोचविली आहे. सदर इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Web Title: Man dies in collision with unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.