इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 11:21 IST2020-05-28T11:20:38+5:302020-05-28T11:21:53+5:30

संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.

mam's dead body found, possibility of assassination! | इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता !

इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता !

बोरगाव मंजू:  स्थानिक मेन रोड स्थित भाजी बाजारात एका पन्नास वर्षिय इसमाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मेन रोड स्थित बोरगाव मंजू येथिल संजय धूळधर वय ५० वर्ष यांचा मृतदेह आज गुरुवारी सकाळी आढळून आला, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाच्या पंचनामा केला, दरम्यान सदर व्यक्तीची अंगावर रक्ताचे डाग आढळून आले, दरम्यान सदर व्यक्तीची हत्या करून मृतदेह भाजीबाजारात आणुन टाकला असावा असा संशय आहे, दरम्यान घटनास्थळी , गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी, ठसे तज्ञ, श्वानास पाचारण करून घटनेचा शोध सुरू आहे, सदर व्यक्तीची हत्या नेमकी कुणी केली, हत्यारे कोण कोण अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी सह गुन्हे अन्वेषण विभाग सह पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title: mam's dead body found, possibility of assassination!