चिमुकलीवर बलात्कारातील दोन्ही मुख्य आरोपी गजाआड

By Admin | Updated: April 18, 2017 20:31 IST2017-04-18T20:31:12+5:302017-04-18T20:31:12+5:30

अकोला : १० वर्षीय चिमुकलीवर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी दिली.

The main accused in the gang rape is Gajaad | चिमुकलीवर बलात्कारातील दोन्ही मुख्य आरोपी गजाआड

चिमुकलीवर बलात्कारातील दोन्ही मुख्य आरोपी गजाआड

आरोपी वाढण्याची शक्यता, पोलीस अधीक्षकांची माहिती

अकोला : जुने शहरातील १० वर्षीय चिमुकलीवर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी हे दोन आरोपींची नावे आहेत. अटकेत असलेला प्रविण चव्हाण या प्रकरणात आरोपी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सदर प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
टिळक रोडवरील शाळेत शिक्षण घेत असलेली दहा वर्षीय चिमुकली तिचे वडील आणि आजीसोबत जुने शहरात राहते. शनिवारी शाळा आटोपल्यानंतर ती चिमुकली प्लास्टिक वेचण्याचे काम करीत असताना त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्स परिसरात गेली. या ठिकाणावरुन तिला माळीपुरा येथील रहिवासी गोविंद परशुराम साखरे (५३) याने चिमुकलीला कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर जाण्यासाठी पैसे दिले. यासोबतच चौथ्या माळ्यावरही तुला पैसे मिळणार असल्याचे सांगितले. नासमज असलेली ही चिमुकली पैशांच्या मोहापायी चौथ्या माळ्यावर जाताच सुभाष चौकातील रहिवासी शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी (१९) आणि त्याचा साथीदार ताजनापेठ परिसरातील रहिवासी मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (२०) या दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या नराधमांच्या अत्याचाराने रक्ताने माखलेली ही चिमुकली हळुवार आणि रडतच चौथ्या माळ्यावरून खाली उतरतांना दिसताच व्यापाऱ्यांना तीच्यासोबत घडलेला प्रकार समजला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असता मुलीला माळयावर पाठविणारा गोवींद साखरे याला रविवारीच अटक करण्यात आली, मात्र त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने या प्रकरणाचे मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रामदास पेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सुभाष चौकातील रहिवासी शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (२०) या दोन नराधमांना अटक करण्यात आली. ही माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते.

Web Title: The main accused in the gang rape is Gajaad