प्रकाश रेड्डीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:37 IST2017-10-25T01:37:17+5:302017-10-25T01:37:25+5:30
अकोला : भाजपाचे नेते प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी यांच्याविरुद्ध महिलेच्या विनयभंगप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश रेड्डीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
ठळक मुद्दे महिलेच्या विनयभंगप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजपाचे नेते प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी यांच्याविरुद्ध महिलेच्या विनयभंगप्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोट फैल पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला तिच्या अल्पवयीन भावासोबत दुचाकीने उगवा फाट्याजवळून जात होती. याच रस्त्याने प्रकाश रेड्डी कारमधून जात होते. त्यांनी दुचाकीवरुन जाणार्या एका महिलेचा पाठलाग करुन तिची गाडी थांबवित विनयभंग केला. या प्रकरणी सदर महिलेने अकोट फैल पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश रेड्डी यांच्याविरुद्ध भादंवि ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.