महावितरणला ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार

By Admin | Updated: December 12, 2014 00:27 IST2014-12-12T00:27:50+5:302014-12-12T00:27:50+5:30

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन २0१४ च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी केली महावितरणची निवड.

Mahavitaran will be the first national award for energy conservation | महावितरणला ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार

महावितरणला ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार

अकोला : ऊर्जा संवर्धनासाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन २0१४ च्या प्रथम राष्ट्रीय पुरस्कारासाठी महावितरणची निवड केली आहे. १४ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. महावितरणच्या वतीने संचालक प्रकल्प प्रभाकर शिंदे हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. महावितरणने गावठाणासाठी स्वतंत्र फीडर्स व सिंगल फेजिंगच्या मदतीने सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार मेगावॉट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन केले. याशिवाय अनावश्यक विजेचा वापर टाळून वीज बचत करावी, यासाठी महावितरणतर्फे शाळा, महाविद्यालयात विशेष अभियान राबविण्यात आले आहे. महावितरणने केलेल्या या कामगिरीची दखल घेवून या पुरस्कारासाठी महावितरणची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Mahavitaran will be the first national award for energy conservation