शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:38 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ अकोला दौऱ्यावर आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीच्या राज्यभर सभा सुरू आहेत. भाजपाच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्याही राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. आमदार वाघ आज अकोला दौऱ्यावर आहेत, त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी एका वाक्यात उत्तर दिले.   

बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

एका मुलीच्या आत्महत्येनंतर आमदार संजय राठोड यांच्यावर टीका करण्यात आल्या होत्या. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सर्वाधिक टीका केल्या होत्या. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना विरोध केला होता. यामुळे आता महायुतीमध्ये आमदार चित्रा वाघ राठोड यांचा प्रचार करणार की नाही या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

दरम्यान, आज अकोल्यात बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आम्हाला पक्षाने कार्यक्रम दिले आहे. ज्या ठिकाणी पक्षाने आम्हाला जायला सांगितले आहे तिथे आम्ही जाणार आहे. कालपासून मी विदर्भात प्रचार सुरू केला आहे. यावेळी पत्रकारांनी वाघ यांना संजय राठोड यांच्या प्रचारासाठी जाणार का? असा प्रश्न केला, यावर बोलताना वाघ म्हणाल्या, महायुतीच्या उमेदवारांनी निवडून आणण्यासाठी जिथे गरज आहे तिथे आम्ही पोहोचणार आहे, असंही आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. 

चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

 भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

"उद्धवजी... बॅगा फक्त तुमच्या तपासल्या जात नाही तर प्रत्येकाच्या बॅगा तपासल्या जातात. मात्र प्रत्येकजण तुमच्यासारखा कांगावा करत नाही. आम्हाला तेवढा वेळ सुद्धा नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करतानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chitra Waghचित्रा वाघAkolaअकोलाSanjay Rathodसंजय राठोडElectionनिवडणूक 2024