प्रवाशांनो लक्ष द्या! महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट तर 4 रेल्वे रद्द

By राजेश शेगोकार | Updated: September 23, 2022 15:48 IST2022-09-23T15:47:28+5:302022-09-23T15:48:17+5:30

सणासुदीच्या व्यस्त हंगामात प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Maharashtra Express short terminated and 4 trains cancelled know details | प्रवाशांनो लक्ष द्या! महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट तर 4 रेल्वे रद्द

प्रवाशांनो लक्ष द्या! महाराष्ट्र एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट तर 4 रेल्वे रद्द

अकोला: तुम्ही येत्या रविवार आणि सोमवारी रेल्वेने नागपूर जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सोमवार, 26 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वे नागपूर विभागातील खापरी स्थानकावर नॉन इंटरलॉक करण्याचे काम करण्यात येणार असल्याने अजनी आणि नागपूर स्थानकावरून धावणाऱ्या 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 4 रेल्वे रद्द तर महाराष्ट्र एक्स्प्रेसही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

11039 कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा स्थानकावर 25 आणि 26 सप्टेंबर रोजी शॉर्ट टर्मिनेशन होईल. तर 
11040 गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा स्थानकातून 26 आणि 27 सप्टेंबर रोजी सुटेल. 

याशिवाय 
१२१२० अजनी अमरावती एक्स्प्रेस २५ व २६ सप्टेंबर,
१२११९ अमरावती अजनी एक्सप्रेस २६ व २७ सप्टेंबर,
०१३७४ नागपूर वर्धा मेमू २४ ते २७ सप्टेंबर,
०१३७३ वर्धा नागपूर एमईएमयू ३२२६ सप्टेंबर दरम्यान धावणार नाहीत. 

तसेच ५ गाड्या परावर्तित मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

Web Title: Maharashtra Express short terminated and 4 trains cancelled know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे