शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:15 PM

प्रत्येक मतदारसंघातील विजय हा ऐतिहासिकच ठरणार आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला. सोमवारी संघ्याकाळापासून विजयाचे दावे- प्रतिदावे, हा गट त्यांना अन् त्या समाजात यांना मतदान झाल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेला मतदानाच्या टक्केवारीची फोडणी बसल्याने गेल्या दोन निवडणुकीची तुलना करून अंदाज व आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे विजय कोणाचा, हे २४ आॅक्टोबर रोजी बाहेर येणार असले तरी प्रत्येक मतदारसंघातील विजय हा ऐतिहासिकच ठरणार आहे.

मूर्तिजापूर : हॅटट्रिक साधणार का? महिला उमेदवारालाही संधीमूर्तिजापूर मतदारसंघाने सलग तिसऱ्यांदा कोणालाही संधी दिलेली नाही त्यामुळे यावेळी हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या आ. हरीश पिंपळे यांना संधी मिळणार की हुकणार, यावर इतिहास घडेल. या मतदारसंघाचे १९६२ मध्ये कुसुमताई कोरपे, १९७२ मध्ये प्रतिभाताई तिडके या दोन महिला आमदारांनी प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी वंचितने प्रतिभा अवचार यांच्या रूपाने सक्षम आव्हान दिले आहे. त्यामुळे त्याचा विजय झाला तर तोही इतिहास ठरेल. अकोला पश्चिम:  डबल हॅटट्रिक की धक्कादायक!अकोला पश्चिम हा गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा गड आहे. गोवर्धन शर्मा यांच्या रूपाने या गडाला जमिनीवरचा गडकरी लाभला असल्याने भाजपाला येथे पराभूत करणे विरोधकांना शक्य झाले नाही. यावेळी शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात आहेत. ते विजयी झाले तर डबल हॅटट्रिक करणारे ते पश्चिम विदर्भातील पहिले आमदार ठरतील अन् एक विक्रम त्यांच्या नावावर जमा होईल. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी, मुस्लीम समाजाचे एकगठ्ठा मतदान यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, काँग्रेसलाही संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा वंचित आघाडीने विजय मिळविला तर या विजयाची इतिहास म्हणून नोंद तर होईलच. बाळापूर : आमदाराची हॅटट्रिक हुकली, नवा चेहराबाळापूर मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला हॅटट्रिकची संधी मिळाली नाही. ती संधी यावेळी बळीराम सिरस्कारांना होती; मात्र त्यांची उमेदवारी कापल्यामुळे ‘हॅटट्रिक नाही’ हा इतिहास पुन्हा एकदा घडला; मात्र यावेळी विजय कोणाचीही झाला तर तो ऐतिहासिक ठरेल. वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला तर या नव्या पक्षाला बाळापूरचा पहिला आमदार, शिवसेना किंवा राष्टÑवादी जिंकली तर या दोन्ही पक्षाला पहिल्यांदा विजयाची संधी अन् एमआयएम जिंकले तर या मतदारसंघातून विधानसभेत जाणारे पहिले मुस्लीम आमदार म्हणून ऐतिहासिक नोंद होईल. अकोला पूर्व: दुसऱ्यांदा आमदार की ब्रेक के बाद संधी?अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीचा बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर केवळ नीळकं ठ सपकाळ आणि हरिदास भदे या दोघांनाच दोन वेळा विजयाची संधी मिळालेली आहे. यावेळी भाजपाचे रणधीर सावरकर व वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे पुन्हा रिंगणात आहेत. आ. सावरकर जिंकले तर दुसºयांदा संधी मिळालेले ते तिसरे आमदार ठरतील. जर हरिदास भदे विजयी झाले तर ब्रेक के बाद पुन्हा संधी मिळणारे ते एकमेव आमदार म्हणून इतिहास घडवतील. अकोट : सलग दुसऱ्यांदा आमदार की दरवेळी नवा आमदार?अकोट मतदारसंघात १९६२ व १९६७ या सलग दोन टर्ममध्ये आबासाहेब खेडकर हे आमदार होते. त्यांच्यानंतर सलग दुसºयांदा आमदार होण्याची संधी या मतदारसंघाने कुणालाही दिलेली नाही. सुधाकरराव गणगणे व बाळासाहेब तायडे हे दोन वेळा आमदार होते; मात्र त्यांच्या कार्यकाळात ब्रेक होता. त्यामुळे यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळविला तर तो इतिहास ठरेल. जर भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस, वंचित किंवा अपक्षाने बाजी मारली तर दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ हा आकोटचा लौकिक कायम राहील.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-west-acअकोला पश्चिमakola-east-acअकोला पूर्वmurtizapur-acमूर्तिजापूरbalapur-acबाळापूरakot-acअकोट