शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 2:31 PM

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत महायुतीचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारआमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी महायुतीमधील शिवसेना, रासप, रिपाइं (आठवले गट), रयत क्रांती, शिवसंग्राम या पक्षासह भाजपाच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारसाकळे यांच्या विजयाचा संकल्प केला.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. अर्ज भरल्यानंतर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. रमेश बुंदिले, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा, जिल्हा चिटणीस रासप जिल्हाध्यक्ष सतीश हांडे, अंजनगावचे नगराध्यक्ष कमलाकर लाडोले, डॉ. बाबूलाल शेळके, श्रीकृष्ण मोरखडे, माधव मानकर, राजेश नागमते, जिल्हा चिटणीस संदीप उगले, कृष्णा तिडके, बाळासाहेब नेरकर, सतीश हांडे, नयना मनतकार, स्मिता राजणकार, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर बोडखे, केशवराव ताथोड, अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, दर्यापूरच्या नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्याम गावंडे, जिल्हा संघटिका माया म्हैसने, कुसुम भगत, अकोट तालुका अध्यक्ष राजेश रावणकार, शहराध्यक्ष कनक कोटक, तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर, शहर अध्यक्ष ओमभाऊ सुईवाल, विजय जवंजाळ, रामदास भेंडे, राजेश पाचाडे, मधुकर पाटकर, दत्तू गावंडे, सुनील गिरी, अनिरुद्ध देशपांडे, हरीश टावरी, संतोष राऊत, चेतन मर्दाने, बाळासाहेब घावट, केवटीताई, मंगेश पटके, पुंजाजी मानकर, प्रवीण येऊल , रमेश दुतोंडे, लखन राजणकर, विठ्ठल वाकोडे, मनोज चंदन, विलास बोडखे, वैभव बढे, श्याम गावंडे, विपुल गडम आदी उपस्थित होते. दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या आदेशावरुन अकोट मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळावा, असे आवाहन केले.

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास- भारसाकळेअकोट मतदारसंघातील जनतेचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे.या परिसरातील प्रश्नांवर मी सातत्याने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सिंचन, पिण्याचे पाणी याबाबतच्या समस्या, त्या सातत्याने लावून धरल्या. केवळ विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि सकारात्मक विचार करून सबका साथ सबका विकास हाच संकल्प असल्याने आपला आशिर्वाद द्यावा असे आवाहन प्रकाश भारसाकळे यांनी केले.

भारसाकळे यांच्या पाठीशी रहा-ना.धोत्रेआमदार म्हणून अकोट मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात प्रकाश भारसाकळे यशस्वी झाले आहेत. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास येतील अशी ग्वाही देत अकोट मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भारसाकळे यांच्या पाठीशी राहून महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा या मतदारसंघावर फडकवावा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळेakot-acअकोटMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019