महान - शेलूबाजार मार्गावर अपघातात दाेन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 16:02 IST2021-10-04T16:00:34+5:302021-10-04T16:02:19+5:30
अकाेला : अकाेला व वाशिम जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या महान ते शेलूबाजार दरम्यान भरधाव जात असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ...

महान - शेलूबाजार मार्गावर अपघातात दाेन ठार
अकाेला : अकाेला व वाशिम जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या महान ते शेलूबाजार दरम्यान भरधाव जात असलेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याची घटना साेमवारी पहाटेच्या सुमारास घडली़. या अपघातात अकाेल्यातील वैभव ढाेरे व परतवाडा येथील धीरज अग्रवाल या दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला असून दाेन जन गंभीररीत्या जखमी झाले आहेत़. अकाेल्यातील खाेेलेश्वर येथील रहीवासी परीमल कारीया, गड्डम प्लाॅट येथील रहीवासी कुशल बगडीया, माेठी उमरी येथील रहीवासी वैभव ढाेरे व परतवाडा येथील रहीवासी धीरज अग्रवाल हे चार जन त्यांच्या हयुंडाइ कारने अकाेल्यावरुन महानमार्गे शेलूबाजारकडे जात असतांना त्यांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात झाडावर आदळली़. त्यामूळे या ठिकाणी झालेल्या भीषन अपघातात माेठी उमरी येथील रहीवासी वैभव ढाेरे व परतवाडा येथील रहीवासी धीरज अग्रवाल या दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला़. तर खाेेलेश्वर येथील रहीवासी परीमल कारीया, गड्डम प्लाॅट येथील रहीवासी कुशल बगडीया हे दाेघे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने शेलुबाजार येथील रुग्णालयात प्राथमीक उपचार करून अकाेल्यात आणण्यात आले़. या दाेघांवरही अकाेल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याची माहीती आहे़. या घटनेची माहीती मीळताच पिंजर पाेलिस व मंगरूळपीर तसेच शेलुबाजार पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले़. जखमींना उपचारासाठी पाठवीले़ तर दाेन्ही युवकांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़. या अपघाताची चाैकशी पाेलिसांनी सुरु केली आहे़.