महाकाली वाईन बारला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:34+5:302021-07-29T04:20:34+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या महाकाली वाईन बारवर मनपा खदान पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली. ...

Mahakali wine bar knocked seal | महाकाली वाईन बारला ठोकले सील

महाकाली वाईन बारला ठोकले सील

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या महाकाली वाईन बारवर मनपा खदान पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली. महाकाली वाईन बारच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून या बारला सील ठोकण्यात आले आहे.

शहरातील महाकाली बारमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांसोबत महापालिकेचे पथकही होते. यावेळी बार सुरु असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत कारवाई केली आणि महापालिका प्रशासनाच्या मदतीने बारला सील केले. तसेच रामदासपेठ पोलिसांनी रेल्वे स्थानक चौकातील बारसहित चार हॉटेलवर कारवाई केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व बारवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी शहरातील चार ते पाच ठिकाणी कारवाई करून काही बारला सील ठोकण्यात आले आहे. तर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mahakali wine bar knocked seal