शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

१५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 19:18 IST

निधी वर्ग केल्याचे समजताच भाजप नगरसेवकांकडून निधीसाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे.

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रभागातील विकास कामांसाठी दिला जाणाऱ्या निधी वाटपातून यापूर्वी अनेकदा डावलल्याचा वचपा शिवसेनेने काढल्याचे समोर आले आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांना मंजूर करण्यात आलेला तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी शिवसेनेने वर्ग केल्याच्या मुद्यावरून मनपाच्या राजकारणात शिवसेना व भाजपमध्ये महाभारत सुरू झाल्याचे चित्र आहे. हा निधी वर्ग केल्याचे समजताच भाजप नगरसेवकांकडून निधीसाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ८० सदस्यांपैकी भाजपाचे ४८ सदस्य विजयी झाले. या निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप-बहुजन महासंघाच्या नगरसेवकांनी एकत्र येत विरोधी बाकांवर बसणे पसंत केले. साहजिकच मनपाची एकहाती सत्ता असणाºया भाजपाने राज्य शासनाकडून प्राप्त विकास कामांच्या निधीचे वाटप करताना शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याचा आरोप सेनेकडून यापूर्वी अनेकदा झाला आहे. राज्यात भाजप-सेनेची युती असतानाही मनपाच्या राजकारणात शिवसेनेला भाजपकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप २०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप-सेनेच्या संयुक्त बैठकीतही केला गेला होता हे विशेष. राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सेना नगरसेवकांच्या मनातील असंतोष व खदखद बाहेर आल्याचे दिसत आहे. तत्कालीन राज्य शासनाने आ. शर्मा यांना विकास कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. हा निधी शिवसेनेचे संपर्कप्रमुख, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या निर्देशानुसार सेना नगरसेवकांच्या प्रभागासाठी वर्ग केल्याची माहिती आहे. या मुद्यावरून मनपाच्या राजकारणात भाजप-सेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलेच घमासान रंगले आहे.आमदार शर्मा यांचे शासनाला पत्रशहरातील विकास कामांसाठी तत्कालीन राज्य शासनाने मंजूर केलेला १५ कोटी रुपयांचा निधी आघाडी सरकारने भाजपसाठी कायम ठेवण्याची मागणी करीत शहरासाठी आणखी १०० कोटींचा निधी देण्याची मागणी आ. गोवर्धन शर्मा यांनी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे. या पत्रावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वेळप्रसंगी न्यायालयात याचिकाशासनाने १५ कोटींचा निधी परत न केल्यास या निर्णयाच्या विरोधात वेळप्रसंगी न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा