महाबीजचे बियाणे मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:15+5:302021-06-19T04:14:15+5:30

बार्शीटाकळी : मागील काही दिवसांपासून महाबीजचे सोयाबीन बियाणे संपल्याचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांसाठी शोधाशोध सुरू आहे. ...

Mahabeej seeds not available! | महाबीजचे बियाणे मिळेना!

महाबीजचे बियाणे मिळेना!

बार्शीटाकळी : मागील काही दिवसांपासून महाबीजचे सोयाबीन बियाणे संपल्याचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांसाठी शोधाशोध सुरू आहे. तरीही शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळत नाही.

पुलाचे काम सुरू करण्याची मागणी

उरळ : नागझरी ते कसुरादरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडले असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.

हिवरखेड सर्कलमध्ये ८.१ मि.मी. पाऊस

हिवरखेड : यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा होती; परंतु बहुतांश गावांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही. हिवरखेड सर्कलमध्ये आतापर्यंत ८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

अकोटात सहा पॉझिटिव्ह

अकोट : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तालुक्यातील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Web Title: Mahabeej seeds not available!