सर्वच क्षेत्रात महिलांना आरक्षणाची गरज महिला मेळाव्यात माफसूचे कुलगुरू मिश्र यांचे प्रतिपादन
By Admin | Updated: June 3, 2014 01:55 IST2014-06-02T22:03:35+5:302014-06-03T01:55:16+5:30
अकोला : देशातील सत्तर टक्के महिला शेतकरी, शेतमूजर असून, खर्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर सर्वच क्षेत्रात त्यांना ३० टक्के आरक्षण द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मिश्र यांनी केले.

सर्वच क्षेत्रात महिलांना आरक्षणाची गरज महिला मेळाव्यात माफसूचे कुलगुरू मिश्र यांचे प्रतिपादन
अकोला : देशातील सत्तर टक्के महिला शेतकरी, शेतमूजर असून, खर्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर सर्वच क्षेत्रात त्यांना ३० टक्के आरक्षण द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मिश्र यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने सोमवार, २ जून रोजी कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित स्त्री शक्ती उत्सव कार्यक्रमात डॉ. मिश्र प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. व्यासपीठावर शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, डॉ.सी.एन. गांगडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना, डॉ. मिश्र यांनी कृषिप्रधान देशात ७० टक्के महिला शेती व शेतीशी निगडित कामे करीत आहेत. तथापि या महिला मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशाला भविष्यात लागणारे अन्नधान्याची गरज बघता प्रतिमाणूस उत्पादन वाढवावे लागणार आहे. महिला शेतकर्यांना सक्षम करू न त्यांना शेतीचे उच्चतंत्रज्ञान समजावून सांगितल्यास त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. त्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच सर्वच क्षेत्रात महिलांना आरक्षणाची गरज आहे. सवर्च क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. मग ग्रामीण शेतकरी महिलांना मागे ठेवून चालणार नसल्याचे ते म्हणाले. महिलांना आदीशक्ती अशी उपमा देऊन, महिला विकास तरच देश विकास होणार असल्याचे अधोरेखित केले.
या प्रसंगी डॉ.दाणी यांनी स्त्री शक्ती उत्सव हा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीच आयोजित केलेला कार्यक्रम असून, ज्या कर्तबार महिलांनी आपले कसब वापरू न शेती क्षेत्रासह विविध क्षेत्रात प्रगती साधली त्यांचा हा कौतुक सोहळा असल्याचे सांगितले.
या स्त्री शक्ती कार्यक्रमाला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती होती. सभागृह महिलांनी भरू न गेले होते.