मुंडगाव सरपंच व ग्रामसेवकाविरुद्धगुन्हा दाखल
By Admin | Updated: February 12, 2015 01:16 IST2015-02-12T01:16:18+5:302015-02-12T01:16:18+5:30
कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारीत केल्याचे प्रकरण.

मुंडगाव सरपंच व ग्रामसेवकाविरुद्धगुन्हा दाखल
आकोट : कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारीत करणार्या मुंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुध्द आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला ११ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडगावच्या सरपंच मंगला विनायक फुसे व ग्रामसेवक विठ्ठल विश्वनाथ भदे रा. सरस्वतीनगर आकोट यांनी संगनमत करून ग्रामसभा न घेता कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारित केला. ग्रामसभा न घेऊन कायद्याची अवहेलना केली. नुकसान पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून दस्तावेज तयार केले अशी तक्रार मुंडगाव येथील विजय रामकृष्ण आखरे यांनी केली होती. परंतु त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त प्रकरणी सरपंच मंगला फुसे व ग्रामसेवक विठ्ठल भदे यांच्या विरुध्द भादंविच्या ४६४, ४७१, १६६, १६७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे अन्य ग्रामपंचायतयचे सरपंच व ग्रामसेवकांचे धाबे दणादले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये असे प्रकार घडतात. मात्र ते उघडकीस येत नाहीत.