किमान तापमानात वाढ

By Admin | Updated: January 2, 2017 02:29 IST2017-01-02T02:29:14+5:302017-01-02T02:29:14+5:30

राज्यातील बहुतेक प्रमुख शहरांतील किमान तापमानात रविवारी काहीशी वाढ झाली आहे. बहुतेक शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले.

Low temperature increase | किमान तापमानात वाढ

किमान तापमानात वाढ

पुणे : राज्यातील बहुतेक प्रमुख शहरांतील किमान तापमानात रविवारी काहीशी वाढ झाली आहे. बहुतेक शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले. राज्यात नाशिक येथे सर्वांत कमी ९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्व शहरांचे किमान तापमान रविवारी सरासरीपेक्षा जास्त होते, तर मराठवाड्यात परभणी येथे तर विदर्भात अमरावती आणि गोंदिया येथे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदविले गेले. कोकणातही रत्नागिरी व डहाणू वगळता किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे चित्र रविवारी होते. राज्यात नाशिक येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असली तरी शनिवारच्या तुलनेत त्यात किंचित वाढ झाली आहे. येथील किमान तापमान सरासरीपेक्षा ०.२ अंश सेल्सिअसने कमी होते. 

Web Title: Low temperature increase