काजळेश्वर येथे प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:44 IST2018-03-16T18:44:37+5:302018-03-16T18:44:37+5:30
बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

काजळेश्वर येथे प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
काजळेश्वर येथील केवल वासुदेव चव्हाण(२८) व अरविंद चव्हाण यांची पत्नी संगीता अरविंद चव्हाण (२६) रा. काजळेश्वर यांचे परस्परावर प्रेम बसल्यामुळे ते तीन महिन्यापुर्वी गावातून पळून गेले होते. हे प्रेमी युगल १५ दिवसापुर्वी गावात परत आले होते . संगीताचे यापुर्वी लग्न झालेले असून तिला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत तर केवलचेसुध्दा लग्न झालेले आहे. अशा स्थितीत विवाहबाह्य प्रेमसंबंध जोपासून गावातून पळून जाऊन ते गावात परतले होते. परंतु, अशा स्थितीत त्यांनी १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता त्यांनी दोघांनी गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सध्या लोकांमध्ये चर्र्चिला जात आहे. ही आत्महत्या नसून खून असावा असेही लोकांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. हे वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांनी कसलीही नोंद केली नव्हती.