अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलास दिला चाेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 10:38 IST2021-05-18T10:35:45+5:302021-05-18T10:38:13+5:30
Akola News : मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गाेडबाेले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे़.

अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलास दिला चाेप
अकाेला: दिवसाढवळ्या अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या लीलांना कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना बेदम चाेप दिल्याची घटना साेमवारी जुने शहरातील गाेडबाेले उद्यानजवळ घडली़. यावेळी या युगुलास डाबकी राेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गाेडबाेले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे़. या भागात दिवसा सामसूम हाेत असल्याचे पाहून काही प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांना ऊत येत असल्याने स्थानिक रहिवासी कमालीचे वैतागले आहेत़. अशाच एका प्रेमीयुगुलास स्थानिक रहिवाशांनी चांगलाच चाेप दिल्याचा प्रकार गाेडबाेले उद्यान भागात घडला़. या प्रकाराची डाबकी राेड पाेलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत प्रेमीजाेड्यास ताब्यात घेतले़. यातील प्रेमवीर काळा माराेती परिसरातील रहिवासी आहे़.
पालकांनाे मुलांना सांभाळा !
काेराेनाच्या काळात शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत़. अशावेळी दुपारी, सायंकाळी आपली मुले,मुली घराबाहेर कशासाठी जातात, काेणत्या कामाची सबब सांगतात. हे तपासण्याची जबाबदारी पालकांची आहे़ मुलांचे फाजील लाड बंद करून त्यांना जमिनीवर आणण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे़.
दुपारी पाेलिसांची हवी गस्त !
गाेडबाेले उद्यान परिसरात गर्द हिरवे वृक्ष आहेत़ या झाडांखाली,उद्यानाच्या भिंतीचा आडाेसा घेऊन प्रेमीयुगुल तासन् तास गप्पात रंगतात़.ही बाब ध्यानात घेता या परिसरात दुपारी डाबकी राेड पाेलिसांनी नियमित गस्त घालण्याची मागणी समाेर आली आहे़.