अकोल्यात रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाण्यामध्ये सोडली कमळाची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 14:06 IST2020-08-16T14:06:28+5:302020-08-16T14:06:55+5:30
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाची फुले सोडून भाजपचा निषेध नोंदविला गेला.

अकोल्यात रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाण्यामध्ये सोडली कमळाची फुले
अकोला : महानगरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास ह्याचे विरोधात आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा - महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडीचे कार्यकर्ते रविवारी लॉक डाऊन असताना रस्त्यावर उतरले.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाची फुले सोडून भाजपचा निषेध नोंदविला गेला. रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी ह्या मागणी करीता तब्बल अकरा ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर वंचित ने आंदोलन केले. गांधी रोड प्रस्तावित अंडरपास च्या कामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात कमळाची फुले सोडली.