शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत, मी पुढाकार घेतो; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 20:26 IST

Nana Patole on Prakash Ambedkar : आज अकोल्यातील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.  

Nana Patole on Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांबाबत बैठका सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार याबाबत बैठका सुरू होत्या. पण, आता वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे आता लोकसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज अकोल्यातील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.  

'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

"बाळासाहेब मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे,  एक जागा की दोन जागा पाहिजेत. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण, महाराष्ट्रामध्ये मत विभाजन होऊन देशाला बर्बाद करणारी भाजप निवडून नाही आली पाहिजे, अनुयायी म्हणून मी या ठिकाणी स्विकारतो आहे. अर्ज मागे घेण्यापर्यंत वाट आहे, आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले निर्णय घेईल, अशी ऑफर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना दिली. 'माझे अधिकार तुम्हाला दाखविलं, असंही नाना पटोले म्हणाले.

"माझे अधिकार काय आहेत, ते तुम्हाला दाखवेल. दिल्ली जायची गरज नाही. तुम्ही घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी माझी. स्वातंत्र्यविरांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला स्वतंत्र भारतात राहण्यची संधी मिळाली आणि आता पुन्हा आपल्याला परकीयांच्या ताब्यात देणं, हे अजिबात कोणही खपवून घेणार नाही, याची किंमत काँग्रेस पक्षाला कितीही सोसावी लागली तरी चालेल, असंही नाना पटोले म्हणाले. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे, पद येतील पद जातील. आता ४०० पार झालं तर पुढच्या निवडणुका होणार नाहीत. जेव्हा यांना मोठं बहुमत मिळेल तेव्हा लोकशाही संपेल, असंही पटोले म्हणाले. 

"मी पण वंचित"

"मी आज त्यांना प्रस्ताव दिला आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलं आहे. मी माझे अधिकार वापरतो, मत विभाजन होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. संविधान वाचवणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यांनी प्रत्ताव द्यावा काँग्रेसची तयारी आहे. माझ्याबद्दलचा त्यांच्यात जास्त राग आहे, मी पण वंचित आहे. मी माझ्या अपमानापेक्षा संविधान महत्वाच आहे. दोस्तीचा हात पुढे केला आहे. शिरुरचे बांदल उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिसत आहे याची त्यांना फक्त आज आठवण करुन दिली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४