शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Lok Sabha Election 2019 : ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही! - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 3:26 PM

‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली.

अकोला : सोलापूर लोकसभा मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये बटण कोणतेही दाबा मतदान भारतीय जनता पक्षालाच जात असल्याच्या मतदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या चार ‘ईव्हीएम’ सील करण्यात आल्या आहेत. अकोल्यात मी मतदान केले; पण ‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही. कारण कागदावरील चिन्ह पुसल्या जाऊ शकते, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली.अ‍ॅड.आंबेडकर यांनी कृषी नगरातील पोदार इंटरनॅशनल हायस्कूलमधील मतदान केंद्रावर दुपारी ४.१० वाजताच्या दरम्यान मतदान केले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. सोलापूरमध्ये चार मशीन सील करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल बाहेर आल्यावर खरे काय ते कळेल, असे सांगताना त्यांनी अकोल्यातही मतदान केल्यानंतर मला माझे छायाचित्र व निशाणी दिसली; परंतु पेट्रोल पंपावर जी पावती मिळते, त्या पावतीवरील अक्षरे काही वेळात पुसली जातात. म्हणूनच ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’च्या निशाणी व अक्षरांच्या बाबतीत त्यांनी शंका व्यक्त केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा मतदार केंद्रावर एका मतदाराने मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान घ्यावे, या मागणीसाठी ‘ईव्हीएम’ फोडले. हीच मतदारांची खरी प्रतिक्रिया असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. अकोल्यात तिरंगी नव्हे, तर सप्तरंगी निवडणूक असल्याचे उपरोधिकपणे बोलताना मतमोजणीनंतर चित्र स्पष्टच होईल. त्यामुळे २३ मेपर्यंत प्रतीक्षा करा असे ते म्हणाले.सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी एका हॉटेलात भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुशीलकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यांनतर कॉमेन्टस् करणे अशोभनीय असल्याचे ते म्हणाले. प्रज्ञा सिंग यांना भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या प्रश्नादाखल त्यांनी राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही आतंकवादी संघटना असून, प्रज्ञा सिंग यांच्यावर गुन्हे आहेत.असे असताना उमेदवारी दिली. कारण संघ दहशतवादी संघटना आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. संघाकडे असणारी शस्त्रे हेच अधोरेखित करते. संघाला लोकशाही नकोय म्हणून जेथे संधी मिळाली तेथे संघ दहशतवादी कारवाया करते. कोणतही धर्म दहशतवादी नसतो. तथापि, आपल्या कारवायांवर पांघरू ण घालण्यासाठी संघ हिंदू नाव पुढे करतो, असा आरोपही त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर