Lok Sabha Election 2019: १६०१ पोस्टर्स-बॅनर्स, २०५ झेंडे काढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:34 IST2019-03-13T13:34:10+5:302019-03-13T13:34:15+5:30
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत गत दोन दिवसांत (मंगळवारपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स-बॅनर्स, होर्डिंग आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली.

Lok Sabha Election 2019: १६०१ पोस्टर्स-बॅनर्स, २०५ झेंडे काढले!
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत गत दोन दिवसांत (मंगळवारपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स-बॅनर्स, होर्डिंग आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत
जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी भिंती व लोखंडी खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि झेंडे २४ तासांत काढण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकारी नरेंद्र लोणकर यांनी १० मार्च रोजी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना दिले होते. त्यानुषंगाने गत दोन दिवसांच्या कालावधीत (१२ मार्चपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली. अशी माहिती अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.