लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 11:20 IST2020-04-03T11:16:52+5:302020-04-03T11:20:08+5:30
१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत.

लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच
अकोला : जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कामानिमित्त देशासह, राज्यातील विविध शहरांमध्ये गेलेले लोक आता लॉकडाउनच्या काळात परत येत आहेत. १ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत. १ एप्रिल रोजी तब्बल ८०० प्रवासी अकोल्यातील विविध भागात दाखल झाले असल्याने सीमा सील करण्याच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.
अकोल्यात १ एप्रिल रोजी दाखल झालेल्यांपैकी सर्वांची आरोग्य तपासणी झाली असून, १९३ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गावांच्या सीमा सील करण्याचा आदेश देतानाच त्यांची तपासणी अनिवार्य केली आहे. जिल्ह्यात परत येणाऱ्यांच्या जत्थ्यांनी आरोग्य यंत्रणेचा ताण कमालीचा वाढवला आहे.
रात्री केला जातो दुचाकींचा वापर
लॉकडाउनच्या काळात दिवसा पोलिसांची गस्त व बंदोबस्त असल्याने जिल्हा सीमा ओलांडण्याची हिंमत कोणी करत नाही; मात्र रात्री काही प्रमाणात बंदोबस्त सुस्तावल्यावर बाहेरगावी जाणाºयांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. राष्टÑीय महामार्गावर बुधवारी रात्री पाहणी केली असता, मोठया प्रमाणात मोटारसायकलवरून युवक जाताना दिसले. काही युवकांनी महामार्गाच्या लगतचा कच्चा रस्ता यासाठी वापरल्याचीही माहिती आहे.
नागपूर, अमरावतीमधूनही येत आहेत युवक
नागपूर, अमरावती या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना सध्या गावाकडे परतण्याचे वेध लागले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे हे तरूण मालवाहतुकीस परवानगी असलेल्या काही वाहनांची मदत घेताना दिसतात तर काही युवकांनी चक्क मोटारसायकलीवरूनच आपले गाव गाठण्याची धडपड सुरू केली आहे.
शेजारी व ग्रामस्थांनी राहावे सजग
शहरात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती त्यांच्या शेजाºयांनी तर गावात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती ग्रामस्थ, सरपंच व सजग ग्रामस्थांनी प्रशासनाला देणे गरजेचे आहे. या प्रवाशांची तपासणी झाली नाही अन् ते कोरोना विषाणूचे वाहक निघाले तर तो त्या परिवारासोबतच सर्वांसाठी धोका ठरणार आहे.