भरधाव ट्रकची ऑटोला धडक; तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 16:51 IST2022-02-16T16:51:40+5:302022-02-16T16:51:56+5:30
Load truck hits auto; Three seriously injured : ऑटोस जबर धडक दिल्याने ऑटो मधील तिघे जण जखमी झाले.

भरधाव ट्रकची ऑटोला धडक; तिघे गंभीर जखमी
मूर्तिजापूर : कारंजा रोड वर असलेल्या तुरखेड फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने ऑटोस दिलेल्या धडकेत ऑटो चालकासह तिघे जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान घडली.
राजीक शाह सिद्दीक शाह वय ४१, मुस्तिक शाह सिद्दीक शाह वय २८, दोघेही राहणार सोनोरी, अब्दुल जावेद अब्दुल जब्बार वय ३० राहणार मूर्तिजापूर हे तिघे ऑटो क्रमांक एमएच ३० एए २७४६ मधून फळं घेऊन विक्रीसाठी कारंजा कडे जात असता ट्रक क्रमांक जीजे २१ डब्ल्यू ७९६४ ने ऑटोस जबर धडक दिल्याने ऑटो मधील तिघे जण जखमी झाले. तर अॉटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमीं पैकी अब्दुल जावेद अब्दुल जबर वय ३०, मुस्तीक शाह वय २८ यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे, एन पी सी राजेश्वर सोनीने, पोलीस कॉनस्टेबल सुदाम यानी जखमी ना तत्काळ उपचारार्थ येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.