पोलिसाच्या दोन बायका अन फजिती ऐका!

By Admin | Updated: August 29, 2016 01:34 IST2016-08-29T01:34:03+5:302016-08-29T01:34:03+5:30

पोलिसाच्या पहिल्या पत्नीने दिला प्रेयसीला चोप.

Listen to two policemen infatuation! | पोलिसाच्या दोन बायका अन फजिती ऐका!

पोलिसाच्या दोन बायका अन फजिती ऐका!

अकोला दि. २८ : रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) कार्यरत एका पोलीस कर्मचार्‍याचे पत्नी असताना दुसर्‍या एका महिलेशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरू न आरपीएफच्या पत्नीने त्या महिलेचा शोध घेऊन रविवारी दुपारी तिला सातव चौकामध्ये चांगलेच झोडपले. पतीला माहित न होऊ देता आरपीएफच्या पत्नीने पतीच्या या प्रेयसीचा शोध घेतला. हा प्रकार पाहण्यासाठी सातव चौकात चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान ती प्रेयसी आरपीएफची दुसरी पत्नी असल्याची चर्चा होती.
आरपीएफमधील पोलीस कर्मचारी पत्नी् मुलांसह न्यू तापडियानगरमधील एका भाड्याच्या घरात राहतात. मात्र पतीला शेगाव येथे आणखी एक प्रेयसी असल्याचा संशय पत्नीला आला. पतीच्या वागणुकीवरून तिचा संशय वाढत गेला. तिने पतीच्या प्रेयसीबाबत बाहेर चौकशी सुरू केली, मात्र या संदर्भात पतीला सुगावा लागू दिला नाही. पतीला दुसरी प्रेयसी असल्याची माहिती पक्की झाल्यानंतर पहिल्या पत्नीने पतीवर पाळत ठेवली. रविवारी दुपारी शेगाव येथील पोलीस कर्मचार्‍याची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी सातव चौक परिसरात आल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. तिने तातडीने सातव चौक परिसरात धाव घेऊन पतीच्या पेयसीला चांगलेच झोडपले. आरपीएफची दुसरी पत्नीच असल्याची चर्चा असल्याने ह्यदोन बायका फजिती ऐकाह्ण चा प्रकार सातव चौकात लोकांना बघायला मिळाला. पोलीस पतीलाही पहिल्या पत्नीने शिव्यांची लाखोली वाहिली. हा वाद भर रस्त्यावर सुरू असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दोन महिलांमधील हाणामारी बघण्याची संधी अनेकांनी साधली. महिलांची मारामारी सुरू असल्याची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार तब्बल एक ते दीड तास सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या दोन बायकांची चर्चा
गत महिन्यातच बाळापूर नाक्यावर एका परिचारिकेने तिच्या पतीसह पोलीस कर्मचारी असलेल्या प्रेयसीला चांगलेच चोपले होते. या ठिकाणी पोलिसाच्या बायको व प्रेयसीचे भांडण पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रविवारी सातव चौक परिसरात आणखी एका पोलीस कर्मचार्‍याच्या दोन बायकांवरून वाद झाले. या ठिकाणीही पोलिसांच्या दोन बायकांवरून चांगलीच चर्चा रंगली. बहुतांश पोलीस पत्नीसह एक प्रेयसी वागवीत असल्याची चर्चा सातव चौकात रंगली होती.

Web Title: Listen to two policemen infatuation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.