भारिप उमेदवारांची यादी पक्ष सचिवांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 10:05 IST2017-01-26T10:05:49+5:302017-01-26T10:05:49+5:30

यादीत भारिप-बहुजन महासंघाच्या ५२ उमेदवारांचा समावेश.

List of Bharamp candidates to party secretaries! | भारिप उमेदवारांची यादी पक्ष सचिवांकडे!

भारिप उमेदवारांची यादी पक्ष सचिवांकडे!

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या निवडणूक निरीक्षक उपसमितीने निश्‍चित केलेली पक्षाच्या उमेदवारांची यादी बुधवारी रात्री पक्षाच्या केंद्रीय सचिवांकडे पाठविण्यात आली. त्यामध्ये पक्षाच्या ५२ उमेदवारांचा समावेश आहे. भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चित करण्यात येत असून, ५२ उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामध्ये २२ मुस्लीम उमेदवार आणि ३0 अनुसूचित जाती व ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. उपसमितीचे प्रमुख बालमुकुंद भिरड आणि माजी आमदार हरिदास भदे यांनी गत सोमवारी मुंबई येथे अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन, उपसमितीने निश्‍चित केलेल्या उमेदवारांच्या यादीवर चर्चा केली होती. त्यावेळी ५२ उमेदवारांच्या यादीला ह्यग्रीन सिग्नलह्ण देत यादी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीमार्फत बुधवारी रात्री पक्षाचे केंद्रीय सचिव ज.वि.पवार यांच्याकडे पाठविण्यात आली.

Web Title: List of Bharamp candidates to party secretaries!