शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वस्त धान्य लाभार्थींच्या यादीत महापौरांसह प्रतिष्ठितांची नावे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:49 IST

अकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील धान्य लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागाकडे असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांमध्ये चक्क महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेविका तसेच काँग्रेसच्या नेत्या सुष्मा निचळ यांचीही नावे असल्याने लाभार्थींची निवड कशी करावी, या पेचात स्वस्त धान्य दुकानदार आहेत. दूसरीकडे संधीचे सोने करत अनेक दुकानदारांनी हवी ती नावे घुसडण्याचा प्रकारही सुरू केल्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे.

ठळक मुद्देदुकानदारांकडून निवड दुचाकी, चारचाकी, मोबाइल नसणारे लाभार्थी

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील धान्य लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागाकडे असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांमध्ये चक्क महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेविका तसेच काँग्रेसच्या नेत्या सुष्मा निचळ यांचीही नावे असल्याने लाभार्थींची निवड कशी करावी, या पेचात स्वस्त धान्य दुकानदार आहेत. दूसरीकडे संधीचे सोने करत अनेक दुकानदारांनी हवी ती नावे घुसडण्याचा प्रकारही सुरू केल्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातून मंजुरी दिली जात आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २0१३ ची राज्यात १ फेब्रुवारी २0१४ पासून अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के लाभार्थी संख्येला अन्नसुरक्षेचे कवच देण्यात आले. शासनाने १७ डिसेंबर २0१३ रोजीच ही संख्या निश्‍चित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात शिधापत्रिका रद्द झाल्या.  पुन्हा पात्र लाभार्थींची संख्या १३ ऑक्टोबर २0१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. त्यानुसार बदललेल्या लाभार्थी संख्येचा सर्वाधिक फटका अकोला जिल्हय़ाला बसला. त्यावेळी जिल्ह्यात प्राधान्य गटातील २३४८९ शिधापत्रिकामध्ये असलेल्या ११७३४६ लाभार्थींना धान्य सुरू ठेवण्यात आले, तर ४७,१७२ केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील २ लाख २९१२१ लाभार्थी वंचित ठेवण्यात आले.  त्या लाभार्थी कुटुंबाच्या ३६८३0 शिधापत्रिकांना प्राधान्य गटात समाविष्ट केले जात आहे. त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ व इतर धान्य मिळणार आहे. 

आर्थिक व्यवहारातून लाभार्थी निवडीची संधीलाभार्थींचे स्वयंघोषणापत्र पाहून त्याला धान्य वाटप सुरू केले जाते. त्यासाठी दिलेल्या घोषणापत्रात उत्पन्न ५९ हजारापेक्षा कमी असणे, पक्के घर नसणे, दुचाकी, चारचाकी, महागडा मोबाइल नाही, असा मजकूर आहे. त्यावर लाभार्थी आणि दुकानदाराची स्वाक्षरी एवढय़ावरच निवड केली जात आहे. त्यामध्ये ज्यांना धान्याची गरज नाही, त्यांची बनावट स्वाक्षरी करून धान्य लाटण्याची संधी दुकानदारांना निर्माण झाली आहे. सोबतच मर्जीतील लाभार्थीही निवडता येतात. या सगळ्य़ा प्रकारामुळे काही दुकानदारांनी संधीचे सोने करणे सुरू केले आहे. त्यासाठी काहींनी आर्थिक व्यवहारही सुरू केल्याची माहिती आहे.

अन्नसुरक्षा कवचापासून वर्षभर वंचितअकोला शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने धान्य वाटपासाठी पात्र लाभार्थी निवडीला प्रचंड विलंब केला आहे. त्यामुळे शहरातील ३६ हजारापेक्षाही अधिक कुटुंबांना कायद्यानुसार अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

स्वयंघोषणापत्राच्या पडताळणीविनाच मंजुरीलाभार्थी निवड करण्यासाठी केशरी शिधापत्रिकाधारकांच्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे सोपवण्यात आल्या. निवड केलेल्या लाभार्थीची स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी घेऊन दुकानदार शहर अन्न धान्य वितरण अधिकार्‍यांची मंजुरी घेत आहेत. ती मंजुरी मिळाली की, त्या लाभार्थींच्या नावे धान्य वाटप सुरू होत आहे.

दुकानदार, अधिकार्‍यांचीही दिरंगाईविशेष म्हणजे, अन्नसुरक्षा कायद्यानुसार लाभार्थी निवड करण्यासाठी शासनाने १३ ऑक्टोबर २0१६ रोजीच निर्देश दिले होते. त्यानुसार शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने २४ नोव्हेंबर २0१६ रोजीच पत्रातून दुकानदारांना त्याबाबत कळवले. त्यानंतर अद्यापही ही निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पुरवठा अधिकारी, दुकानदारांच्या दिरंगाईचा फटका अकोला शहरातील दोन लाख लाभार्थींना बसत आहे. कायद्यानुसार हा प्रकार दंडास पात्र आहे. 

माझ्या कुटुंबाकडे कोणती शिधापत्रिका आहे, हे माहिती नाही. केशरी शिधापत्रिकाधारकांतून निवड होत असताना त्यामध्ये कुटुंबाचा समावेश होऊन मिळणारे धान्य घेण्याचे कारण नाही. आपण आयकर भरत आहो, त्यामुळे या लाभासाठी निवड करू नये, असे पत्र पुरवठा विभागाला दिले जाईल. - विजय अग्रवाल, महापौर महापालिका. 

पात्र लाभार्थींची यादी दुकानात लावली जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांकडून धान्य दुकानदारांनी दिलेल्या स्वयंघोषणापत्रातील माहिती चुकीची असल्याच्या तक्रारी झाल्यास लाभार्थी अपात्र केला जाईल. - रमेश पवार, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी, अकोला.

शहरातील लाभार्थींनी दुकानदारांकडे जाऊन कोणाला पात्र ठरवले जात आहे, याची माहिती घ्यावी, स्वत:चे कुटुंब पात्र ठरत असल्यास दुकानदारांकडून प्रस्ताव द्यावे, अपात्र नावे निदर्शनास आणून द्यावी. - संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.