राहत्या घरातून दारूची विक्री करणारा अटकेत

By सचिन राऊत | Updated: September 23, 2022 18:23 IST2022-09-23T18:23:03+5:302022-09-23T18:23:37+5:30

अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर चौक येथे राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री ...

Liquor seller from residential house arrested | राहत्या घरातून दारूची विक्री करणारा अटकेत

राहत्या घरातून दारूची विक्री करणारा अटकेत

अकोला: अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीम नगर चौक येथे राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यास पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे़ अकोट फैलातील भीम चौक परिसरातील रहिवासी संग्राम विजय सावळे वय २६ वर्ष हा त्याच्या राहत्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली़ या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून सावळे यांच्या घरात छापा टाकला़ यावेळी त्याला दारू विक्री करताना रंगेहात अटक करण्यात आली़ त्याच्याकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी आरोपीविरुद्ध अकोट फाईल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Liquor seller from residential house arrested

टॅग्स :Akolaअकोला