दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 02:23 IST2017-03-12T02:23:15+5:302017-03-12T02:23:15+5:30
एमआयडीसी परिसरातून ३0 हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त.

दारूचा साठा जप्त
अकोला, दि. ११- एमआयडीसी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने ३0 हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली असून, एका युवकास ताब्यात घेण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवर येथील रहिवासी मंगेश बाबुराव जगताप हा देशी दारूचा अवैध साठा घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसीमध्ये छापा टाकून देशी दारूचे १२ बॉक्स किंमत सुमारे ३0 हजार रुपये जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्यांनी केली.