व्हिडिओ पार्लरमधून दारूचा साठा जप्त

By Admin | Updated: April 9, 2017 01:31 IST2017-04-09T01:31:51+5:302017-04-09T01:31:51+5:30

किसान व्हिडिओ पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ३६ हजार रुपयांच्या देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला.

The liquor baron was seized from the video parlor | व्हिडिओ पार्लरमधून दारूचा साठा जप्त

व्हिडिओ पार्लरमधून दारूचा साठा जप्त

अकोला : टिळक रोडवरील उदय टॉकीजसमोर असलेल्या किसान व्हिडिओ पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ३६ हजार रुपयांच्या देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
किसान व्हिडिओ पार्लरमधून अवैधरीत्या देशी आणि विदेशी दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी या ठिकाणावरून सात बॉक्स बीअर आणि दोन बॉक्स मिक्स दारू असा एकूण ३६ हजार रुपयांचा देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त केला. या पार्लरमधून दारूची विक्री करणारा कन्हैयालाल भरगड आणि मनोज वाडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, पीएसआय शशिकिरण नावकार, नरेंद्र चर्‍हाटे, शेर अली, राजेश वानखडे, संदीप काटकर आणि अमित दुबे यांनी केली.

Web Title: The liquor baron was seized from the video parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.