पातुरात वीज कोसळली: एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:06 IST2019-06-22T18:05:38+5:302019-06-22T18:06:23+5:30
पातूर(अकोला): वादळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

पातुरात वीज कोसळली: एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक गंभीर
पातूर(अकोला): वादळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ जून रोजी पातुर शहराजवळ घडली. अभिजीत श्रीकृष्ण इंगळे (१८) असे मृतकाचे तर मयूर रामकृष्ण इंगळे रा. वरखेड वाघजाळी ता. बार्शीटाकळी असे गंभीर जखमीचे नाव आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड वाघजाळी येथील अभिजीत इंगळे व त्याचा चुलत भाउ मयूर इंगळे हे पातुरातील आयटीआयमध्ये शनिवारी दुपारी प्रवेश घेण्यासाठी आले होते. प्रवेश प्रक्रीयेचे काम आटोपल्यानंतर ते गावी जाण्यात निघाले असता वादळी पाउस सुरू झाला. या पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी रस्त्यावरील झाडाचा आधार घेतला. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने अभिजीत इंगळे याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर मयूर इंगळे हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देउन जखमीस तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.