कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सहा गायींना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:20+5:302021-06-02T04:16:20+5:30

पठाणपुरा जुनी वस्ती मशीदजवळ कत्तलीच्या उद्देशाने घरासमोर ६ गायींना निर्दयपणे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळी ...

Life for six cows tied for slaughter | कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सहा गायींना जीवनदान

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सहा गायींना जीवनदान

पठाणपुरा जुनी वस्ती मशीदजवळ कत्तलीच्या उद्देशाने घरासमोर ६ गायींना निर्दयपणे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता नियाजोद्दीन रियासोद्दीन (२५) रा. पठाणपुरा याच्या घरासमोर गोवंश जातीच्या ६ लहान मोठ्या गायी (एकूण किंमत ८२ हजार रुपये) गळ्यात घट्ट बांधलेला दोर व समोरचे पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या, पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत नियाजोद्दीन याच्याकडे गायी खरेदीबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत व पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला. या प्रकरणी नियाजोद्दीन याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.

Web Title: Life for six cows tied for slaughter