दिव्यांगांचा आधार ठरतेय लुईस ब्रेल वाचक, लेखनिक बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:55 PM2019-05-11T14:55:23+5:302019-05-11T14:55:39+5:30

अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरी अंतर्गत राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेली लुईस ब्रेल वाचक व लेखनिक दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा आधार देत आहे.

 Lewis Braille readers, writers bank, to support Divyang's support | दिव्यांगांचा आधार ठरतेय लुईस ब्रेल वाचक, लेखनिक बँक

दिव्यांगांचा आधार ठरतेय लुईस ब्रेल वाचक, लेखनिक बँक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरी अंतर्गत राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेली लुईस ब्रेल वाचक व लेखनिक दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा आधार देत आहे. २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या विद्यापीठ परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक उपलब्ध करून दिले.
शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. विशाल कोरडे यांनी दिव्यांग आर्ट गॅलरी अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक सुरू केली आहे. या माध्यमातून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाचक व लेखनिक पुरवत आहेत. २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेसाठी काही अंध विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणीशिवाय परीक्षा देता यावी, यानुषंगाने लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँके चे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत. विद्यापीठाच्या नियमानुसार या बँकेचे कार्य विद्यापीठातील दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त ठरत आहे. विद्यापीठांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था पुरविण्यात येत नसल्याने लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक या विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या परीक्षेमध्ये सुरभी दोडके, वैष्णवी गोतमारे, नचिकेत बडगुजर, राघवेंद्र करांडे, पायल तायडे, प्रिया सराटे, माधव गोतमारे, राहुल पोपटकर, कृष्णा पळसकर, केशव मेसरे, अपूर्वा धुमाळे, मुक्ता धुमाळे, गौरी शेगोकार, विशाल बोरे, अनिकेत चोटमल, अंकुश काळमेघ, संध्या प्रजापती, माधव जोशी, दीपाली दांदळे व प्रवीण शिंदे आदी सदस्य वाचक व लेखनिक म्हणून सहकार्य करीत आहेत. यासोबतच दिव्यांग आर्ट गॅलरीचे प्रा. विशाल कोरडे, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, विजय कोरडे, वैशाली सोनकर, रवी पिंपळे, श्रीकांत तळोकार, कार्तिक काळे, जानवी राठोड, जया देव, अक्षय राऊत, अमृता भुरे, तुषार सिंगोकार, विशाल भोजने व मीनाक्षी पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

 

Web Title:  Lewis Braille readers, writers bank, to support Divyang's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला