शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बोगस बियाणे ओळखण्यासाठी आता पोलिसांना देणार धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:58 AM

अकोला : विदर्भात दरवर्षी बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अप्रमाणित बियाणे विक ले जाते. यावर्षीही असे बियाणे विकले जाण्याची शक्यता बघता, कृषी विभागाने अमरावती विभागीय स्तरावर ६१ भरारी पथके तयार केली आहेत. यावर्षी या कामी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही बोगस, अप्रमाणित बियाणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठळक मुद्देमहसूल अधिकारी, कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात दरवर्षी बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अप्रमाणित बियाणे विक ले जाते. यावर्षीही असे बियाणे विकले जाण्याची शक्यता बघता, कृषी विभागाने अमरावती विभागीय स्तरावर ६१ भरारी पथके तयार केली आहेत. यावर्षी या कामी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही बोगस, अप्रमाणित बियाणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.पश्‍चिम विदर्भात मागील चार-पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात बोगस, अप्रमाणित बियाणे व रासायनिक खताचा साठा आढळून आला. गतवर्षी अप्रमाणित कीटक, तणनाशकांचा साठा अकोल्यासह अमरावती, यवतमाळ व इतर जिल्हय़ात आढळला. त्या अगोदर मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडला होता. अकोटात सोयाबनीचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होता. बोगस रासायनिक खतेही आढळून आली. पण, मागील पाच वर्षांत सापडलेल्या बोगस खताचा किती साठा  विकला गेला, काय कारवाई केली, याची अद्याप पूर्ण माहिती नाही. ही खते शोधून काढण्यासाठी अधिकार्‍यांची मोठी कसोटी लागणार असल्याचे ‘लोकमत’ने या संबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष. पश्‍चिम विदर्भात कोणतीही व्यक्ती बोगस व बेकायदेशीर बियाण्यांची विक्री-व्यापार करताना आढळल्यास, त्याच्यावर बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. बोगस बियाणे विक्रीचा व्यवसाय करताना कोणी आढळल्यास शेतकरी, कृषी निविष्ठा वितरक, विक्रेते तसेच नागरिकांनी तत्काळ कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांक १८00२३३४000 वर संपर्क साधणे गरजेचे आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कापसाच्या  बोगस बियाण्यांमुळे शेतीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी शेतकर्‍यांनी कापूस बियाण्याची खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करतेवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. बोलगार्ड २ बियाणे घेतेवेळी पाकीट सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करू न घ्यावी. बोलगार्ड २ चे अधिकृत चिन्ह व शासनाचे मान्यताप्राप्त चिन्ह पाहूनच शेतकर्‍यांनी बियाणे, खते खरेदी करणे गरजेचे आहे.

अप्रमाणित खते; प्रकरण न्यायालयात अकोल्यातील औद्योगिक वसाहतीत २0१६-१७ च्या खरीप हंगामात अप्रमाणित खताचा साठा सापडला होता. त्या प्रकरणाची न्यायालयात सुणावणी सुरू  आहे. ६ एप्रिलला हे प्रकरण न्यायालयासमोर आले होते. आता येत्या १0 एप्रिलला यावर सुनावणी होणार असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी विभाग स्तरावर ६१ भरारी पथके तयार करण्यात आली असून, पोलीस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची मदत घेतली जाणार आहे. याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाणार. - डॉ. पी.व्ही. चेडे, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी, अमरावती. 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस