व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:56 IST2020-08-09T12:56:39+5:302020-08-09T12:56:46+5:30

प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

Lessons for education through WhatsApp group! | व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे!

व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे!

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हॉट्स अ‍ॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत शाळा-महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये अंगणवाड्या-बालवाड्या बंद असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम ठप्प आहे. या पृष्ठभूमीवर अंगणवाड्यातील चिमुकल्यांच्या पालकांचा व्हाट्स अ‍ॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडी सेविकांमार्फत अक्षर ओळख, रंग ओळख , स्पर्शज्ञान आदी प्रकारच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची माहिती पालकांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पालकांमार्फत चिमुकल्यांकडून कृती करून घेतली जाते. व्हॉट्स अ‍ॅप गृपद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्या मुला-मुलींना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गायगाव, अंदुरा, व्याळा, रिधोरा व निंबा इत्यादी पाच गावातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.


कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हाट्स अ‍ॅप गृप तयार करून बाळापूर तालुक्यात पाच गावातील २२ अंगणवाड्यांतील मुला-मुलींना अंगणवाडी सेविकांमार्फत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-भारती लांडे,
बाल विकास प्रकल्प अधिकारी, बाळापूर.

 

Web Title: Lessons for education through WhatsApp group!