डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:31 PM2020-11-25T17:31:08+5:302020-11-25T17:31:29+5:30

SatBara News संगणकीकृत सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही

Legal validity of Satbara, 8A form in digital signature! | डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

Next

-संतोष येलकर

अकोला: डिजिटल स्वाक्षरीतील डेटाबेस आधारित संगणकीकृत सातबारा, गाव नमुना ८ अ आणि गाव नमुना नंबर ६ इत्यादी अभिलेख्यास कायदेशीर वैधता राहणार असून, यासंदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह क्षेत्रीय महसुली अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ नोव्हेंबर रोजी परिपत्रकाव्दारे दिले आहेत.

शासनाच्या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध होणारे क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरीतील डाटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नंबर सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ इत्यादी नमुन्यांचा अधिकार अभिलेख विषयक उतारा कायदेशीर व शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी वैध राहतील. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व क्षेत्रीय महसुली प्राधिकारी अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाव्दारे देण्यात आले आहेत.

 

तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही!

डिजिटल स्वाक्षरीतील डेटाबेस आधारित संगणकीकृत सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही, असेही महसूल व वन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

शासनाच्या परिपत्रकानुसार डिजिटल डाटाबेस आधारित संगणकीकृत सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ इत्यादी अधिकार अभिलेखास कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील क्षेत्रीय संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

- जितेंद्र पापळकर

जिल्हाधिकारी, अकोला.

Web Title: Legal validity of Satbara, 8A form in digital signature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.