चार मुलांच्या आईला सोडून पित्याचे महिलेसोबत पलायन
By Admin | Updated: March 7, 2017 02:10 IST2017-03-07T02:10:49+5:302017-03-07T02:10:49+5:30
सदर इसम हा कर्नाटकमध्ये गेल्याचा संशय त्याच्या पत्नीने पोलीसांजवळ व्यक्त केला.

चार मुलांच्या आईला सोडून पित्याचे महिलेसोबत पलायन
सायखेड (अकोला), दि. ६- चार मुलांना व पत्नीला वार्यावर सोडून पतीने एका महिलेबरोबर पलायन केल्याची घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली. ही घटना लक्षात येताच त्याच्या पत्नीने वडीलांसह सोमवारी बाश्रीटाकळी पोलीस ठाणे गाठले.
आळंदा येथील शंकर जानराव बावनकर या विवाहित इसमाने बाश्रीटाकळी शहरातील एका जिनिंगमध्ये काम करणार्या महिलेबरोबर सूत जुळवले. तसेच पत्नीला व दोन मुले, दोन मुलींना सोडून त्या महिलेबरोबर पलायन केले. ही बाब लक्षात येताच त्याची पत्नी कल्पना बावनकर यांनी बाश्रीटाकळी पोलिसात धाव घेतली. सदर इसम हा कर्नाटकमध्ये गेल्याचा संशय त्याच्या पत्नीने पोलीसांजवळ व्यक्त केला आहे.