शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण बंद; साहित्य जप्त

By admin | Updated: March 6, 2015 02:07 IST

करमणूक कर थकीतप्रकरणी अकोला जिल्हाधिका-यांच्या पथकाची कारवाई.

अकोला: थकीत करमणूक करापोटी शहरातील सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण बंद करून, प्रक्षेपणाचे साहित्य जप्त करण्याची कारवाई जिल्हाधिकार्‍यांच्या करमणूक कर वसुली पथकामार्फत बुधवारी करण्यात आली. जिल्ह्यातील करमणूक कर वसुलीचे यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशानुसार करमणूक कर वसुली करण्याकरिता जिल्हा स्तरावर पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामार्फत केबल ऑपरेटर्सकडून थकीत करमणूक कर वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये थकीत करमणूक करापोटी अकोला शहरातील बैदपुरा येथील एजाज खान, भीमनगरमधील किरण इंगळे, सोनटक्के प्लॉटमधील मंगेश वाडेकर व राजू पठाण, मोहता मिल रोडस्थित शेख आसीफ शे.हसन व राधाकिसन प्लॉटमधील चंदू शहा इत्यादी सहा केबल ऑपरेटर्सचे प्रक्षेपण साहित्य जप्त करून, त्यांचे केबल प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली. या सहा केबल ऑपरेटर्सकडे एकूण २ लाख १६ हजार ९२५ रुपये करमणूक कर थकीत असून, थकीत करमणूक करापोटी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. करमणूक कराचा भरणा न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पथकामार्फत सदर केबल ऑपरेटर्सना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये देण्यात आला.