शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:40 IST2017-08-14T20:32:05+5:302017-08-14T20:40:32+5:30
अकोला : देशाचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले अकोला तालुक्यातील लोणाग्रा येथील वीर सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे संपूर्ण शासकीय इतमामात, लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्या त आले.

शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशाचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले अकोला तालुक्यातील लोणाग्रा येथील वीर सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे संपूर्ण शासकीय इतमामात, लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्या त आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार बळीराम सिरस्कार, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पुलगाव येथील सेशन कमांडर आशिषसिंग चंदेल, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, हरिदास भदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुरेश खंडारे, माजी सैनिक संघटना, माजी सैनिक महार रेजिमेंट संघटना एनसीसी ऑफीसर डॉ. आनंद काळे लोणाग्राचे सरपंच निर्मला सोनोने तसेच वीर जवानाचे वडील वामनराव शंकरराव गवई, आई मायाव ती व भाऊ शुभम गवई यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
सोमवारी १२ वाजता लोणाग्रा येथील घरापासून अं त्ययात्रा सुरू झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत थोडावेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथून रमेश चांडक यांच्या शेतात गावातून मिरवणूक काढून नेण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने उ पस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी सुमेध गवई अमर रहे, भारत माता की जय, जय हिंदच्या घोषणा दिल्या. रमेश चांडक यांच्या शेतातील अं त्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या जागेवर नेल्यानं तर प्रथम आई-वडिलांनी पुष्पचक्र अर्पण केले, त्यानंतर पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटना, जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून आकाशात फायरिंग करून सलामी देण्यात आली, नंतर लष्कराच्यावतीने सलामी देण्यात आली. यावेळी बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सामूहिक त्रीशरण, पंचशील प्रार्थना यावेळी कण्यात आली. सलामी आणि मानवंदनेनंतर पार्थिवाला शहीद सुमेध गवई यांचे वडील वामनराव गवई यांनी मुखाग्नी दिला. यावेळी हजारो लोकांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.